वैजापूर, (प्रतिनिधी) : घराजवळ बाथरूम बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला फायटर आणि गजाने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील महालगाव येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महालगाव येथे घराजवळ बाथरूम बांधण्याच्या कारणावरून प्रकाश पावलास आल्हाट व रोहीत सुभाष आल्हाट यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी फायटर आणि गजाने प्रकाश यांना मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले.
या प्रकरणी प्रकाश आल्हाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहीत आल्हाट, सुभाष वामन आल्हाट, सुरेश सुभाष आल्हाट, प्रकाश सुभाष आल्हाट, नर्मदाबाई सुभाष आल्हाट, सविता सुरेश आल्हाट, विद्या रोहीत आल्हाट, वर्षा प्रकाश आल्हाट सर्वरा. महालगाव या आठ जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मनोज कुलकर्णी हे करीत आहेत.












